पंजाबमध्ये पोलिसांवर हल्ला ; तलवारीने कापला हात

पंजाब - करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जात आहे.पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहे. पंजाबमध्ये लॉकडाउनच्या काळात बाहेर फिरणाऱ्या निहंगा टोळक्याने कर्फ्यू पास मागणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा तलवारीने हातच कापला. यात इतर दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. पटियाळातील भाजी मंडई परिसरात ही घटना घडली.
महाराष्ट्राप्रमाणेच पंजाबमधील स्थितीही करोनामुळे गंभीर झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी गर्दी थांबवण्यासाठी कायद्याची कडक भूमिका घेत अमलबजावणी सुरू केली. मात्र, दुसरीकडं पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. पटियालामध्ये निहंगा टोळक्याने पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. निहंगांचा एक गट एका पांढऱ्या गाडीतून पटियालातील भाजी मंडईमध्ये जात होते. यावेळी लॉकडाउन असल्याने बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कर्फ्यू पास दाखवण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी निहंगांच्या गटाने गाडी थेट भाजी मंडईच्या रस्त्यावर असलेले बॅरिकेट्स तोडले आणि पुढे निघून गेले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निहंगांच्या टोळक्याने पोलिसांवरच हल्ला केला. या हल्ल्यात टोळक्यानं एका सहायक पोलीस निरीक्षकाचा तलवारीने हातच कापला. तर दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget