संकटाच्या काळात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे राहुल गांधींकडून कौतूक

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.कोरोनाविरुद्ध लढ्यात देशातील आशा, परिचारिका आणि अंगणवाडी सेविका जीव धोक्यात घालून धैर्याने व समर्पणाने काम करीत आहेत. गरजेच्या वेळी देशाची सेवा करणे ही सर्वात मोठी देशभक्ती आहे. हेच खरे देशभक्त आहेत. जे संकटाच्या वेळी लोकांना सुरक्षित ठेवण्याचे काम करत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.मी देशाच्या सेवेसाठी प्रत्येक सेवा कर्मचार्‍याला सलाम करतो आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, असेही राहुल गांधी म्हणाले. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ६,४१२ झाली आहे.देशातील एकूण रुग्णांपैकी ५,७०९ रुग्ण हे अ‌ॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत सुमारे ५०४ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तसेच, देशात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाच्या ३० नव्या बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण बळींचा आकडा १९९ वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget