'पालघर' प्रकरणात भाजप कार्यकर्त्यांचा हाथ - सचिन सावंत

मुंबई - पालघरमध्ये ज्या गावात ही घटना घडली तो भाजपचा गड आहे. गेल्या १० वर्षापासून तिथे भाजपची सत्ता आहे. चित्रा सावंत आताच्या सरपंचही भाजपच्या आहेत. तसेच आता ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्यात अनेक भाजपचे सदस्य आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली. व्हिडिओ पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.सावंत पुढे म्हणाले, गृहमंत्र्यांनी बुधवारी १०१ लोकांची यादी जाहीर केली. या यादीत आरोपी क्रं. ६१ आणि ६५ हे भाजपच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी आहेत. ईश्वर निकुळे आणि भाऊ दाकल साठे अशी यांची नावे आहेत. ते गडचिंचोली येथीलच रहिवासी आहेत. तसेच या यादीत निकुळे यांचे नातेवाईक सुद्धा समाविष्ट आहेत.यावेळी त्यांनी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि आरोपी भाजपशी संबंधित आहे, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात भाजपने अजूनही कारवाई केली नाही. सरकार त्यांना कठोर शिक्षा करेल. मात्र, भाजपनेही त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपकडे करत असल्याचे त्यांनी सांगितले.आधीच्या भाजप सरकारमध्ये अनेक मॉब लिंचिंगच्या घटना घडल्या. सध्याच्या गंभीर वातावरणात भाजपला राजकारण कसे सुचू शकते? असा सवालही त्यांनी यावेळी केला. विरोधी पक्ष बेजबाबदार आहे. फेक न्यूज बाबत चिंतन करण्याची गरज आहे. अफवा कोणी पसरवल्या याबाबतही विचार करण्याची गरज आहे. अर्णब गोस्वामीवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. राजकीय दृष्टीकोनातून आम्ही ही मागणी करत नाही. तर संपूर्ण देशपातळीवर सर्वच स्तरांतून ही मागणी होत आहे.महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.तर कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टींग होण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. तर केंद्र सरकारने अजूनही जबाबदारी पूर्वक राज्य सरकारला टेस्टिंग किट पुरवले नसल्याचा, आरोपही त्यांनी केला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget