सुरतमध्ये डी मार्टच्या एक्झिक्युटिव्हला कोरोना, सर्वच ग्राहक होम क्वारंटाईनमध्ये

सुरत - गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे अहमदाबादेत आहेत. मात्र, आता सुरतमध्ये डी मार्टच्या येथे संसर्गझाल्याची माहिती समोर आली आहे.यामुळे तब्बल १,४९३ लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. १ एप्रिलला गुजरातच्या सुरतमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सुरतच्या पांडेसरा-बमरोली रोडवरील डी-मार्ट स्टोअरच्या पॅकेजिंग डिपार्टमेंटमध्ये कामाला असलेल्या एका २२ वर्षीय एक्झिक्युटिव्हला कोरोनाची लागन झाली आहे. तो कामगार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तसेच, या कामगाराचा कुठलाही परदेशी प्रवासाचा अहवाल नाही, असे सांगण्यात आले आहे. त्यासोबतच सुरतमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा १० वर पोहोचला आहे. या कामगाराला सध्या न्यू सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या कामगाराला कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या काही दिवसां डी-मार्टमध्ये आलेल्या १,४९३ ग्राहकांना तसेच, हे डी-मार्ट जिथे आहे तेथील १,५६९ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. या सर्व नागरिकांना पालिकेने विशेष मेसेजिंग सिस्टिमच्या माध्यमातून आवश्यक निर्देश दिले जात आहेत. तसेच, पांडेसरा येथील हे डी-मार्ट बंद करण्यात आले आहे.Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget