कोरोनाशी लढताना राजकीय पक्षांनी राजकारण करु नये - शरद पवार

मुंबई - कोरोनावर मात करताना सर्वांनी एकत्र येऊया कोरोनावर मात करणे महत्त्वाचे असून राजकीय पक्षांनी राजकारण करु नये अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. मंगळवारी वांद्र्यात घडलेला प्रसंग दुर्देवी असल्याचंही पवार म्हणाले. कोणीतरी अफवा पसरवल्याने गर्दी झाली. वांद्र्यासारखा प्रकार पुन्हा घडू नये, संभ्रम वाढेल अशा सूचना करु नका असेही ते म्हणाले. 
भारतात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. इटली, स्पेन, अमेरिकेमधील कोरोनाची तुलना करत नाही. परंतु आपण नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतीयांची प्रतिकारशक्ती अधिक असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री, पंतप्रधान वेळोवेळी जनतेशी संवाद साधत आहेत. सर्वांना सूचना करत आहेत. सरकारकडून सांगण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे, नियमाचं सर्वांनी पालन करण्याचे जनतेला आवाहन करत पवारांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. 
कोरोनामुळे राज्याच्या अर्थकारणाला मोठा धोका होऊ शकतो. उद्योग बंद असल्याने बेरोजगारीचे संकट वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही सीएसआर देण्याची मागणी पवार यांनी केली आहे. पिण्याचे पाणी कमी पडू नये, अन्नधान्य कमी पडू नये याची खबरदारी घेण्याचेही शरद पवार यांनी सांगितले आहे.




Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget