पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय मच्छीमारांवर गोळीबार

द्वारका - देवभूमी द्वारका जिल्ह्यातील ओखा येथून दोन मासेमारी नौकांनी रविवारी सायंकाळी चुकून आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेखा ओलांडली. त्यानंतर पाकिस्तान मरीनच्या जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये एक मच्छिमार जखमी झाल्याची माहिती द्वारका येथील पोलिस अधीक्षक रोहन आनंद यांनी दिली आहे.आनंद यांनी सांगितले की, दोन भारतीय नौकांनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेखा ओलांडली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केला. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार यात एक भारतीय मच्छीमार जखमी झाला.
मच्छीमारांनी त्यांच्या रेडिओ सेटवरुन भारतीय तटरक्षक दलाला संपर्क साधला होता. त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानच्या भागाशी संपर्क साधला असता पाक मरीनने दोन बोटी पकडल्याची पुष्टी केली आहे. त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने या दोन्ही बोटी परत आणण्यासाठी आपले 'अरिंजय' जहाज पाठवले', अशी माहिती देखील रोहन आनंद यांनी दिली आहे.गुजरात सरकारने लॉकडाऊन दरम्यान मासेमारी उद्योगांना त्यांचे काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर रविवारी या भारतीय नौका अरबी समुद्रात गेल्या होत्या.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget