नायर हॉस्पिटलच्या नर्सवर घर सोडण्यासाठी दबाव

मुंबई - कोरोना संसर्गाची भीती आपल्याप्रमाणे वैद्यकीय सेवेत अहोरात्र काम करणाºया डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांनाही आहे. जिवाला धोका असतानाही ते आपल्यासाठी काम करत असतात परंतु, काहींना जाणीवच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.नायर रुग्णालयातील एका तेवीस वर्षीय परिचारिकेलाही रोज अवहेलना सहन करावी लागत असून, रुग्णालयात काम करते म्हणून येता-जाता सोसायटीतील रहिवाशांकडून तिला अपमान सहन करावा लागत आहे. 
मूळची धुळ्याची असलेली ही तरुणी मुंबईत भाड्याने राहते. कोरोनाचा संसर्ग सुरू होण्यापूर्वी तिला कोणताही त्रास नव्हता. मात्र, मागील काही दिवसांपासून ‘ही हॉस्पिटलमध्ये काम करते. त्यामुळे तिला इमारतीतून बाहेर काढा’, असा घोशा सोसायटीतील काहीजणांनी सुरू केला. भाड्याचे घर तातडीने सोडून जा, असा सल्ला तिला देण्यात आला.या तरुणीच्या चपला फेकून देणे. खोली सोडण्यासाठी तिला वारंवार बजावणे असे प्रकार सुरू राहिल्यानंतर या तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी येऊन समज दिली तरीही त्रास देणाऱ्या व्यक्तींच्या वागण्यात काही फरक पडला नाही. सध्या या तरुणीने अखेर मामाच्या घरी जाऊन राहण्याचा पर्याय स्वीकारला असून, तिथून ती नायर रुग्णालयात सतत काम करत आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget