मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला वसईच्या राजाची साद

वसई - अख्खे जग कोरोना विषाणू संसर्ग च्या सावटाखाली असताना प्रत्येक देश या आस्मानी संकटाचा मोठ्या धाडसाने सामना करत आहे. भारत देखील या संकटातून मार्ग काढण्यासाठी कार्यरत असुन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे व आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे कोरोनाबाबतची सकारात्मक पद्धतीने लढा देत आहे. 
राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असताना रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने विविध रुग्णांचे रक्तविना हालअपेष्टा होऊ नये म्हणून मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी संस्थांना, सार्वजनिक उत्सव मंडळांना, संघटनांना रक्तदान शिबीर भरविण्याकरीता आवाहन केले त्या आवाहनाला वसईच्या राजाने साद देऊन आज दि ३० मार्च रोजी विजयी ब्लडबँक येथे रुद्रतांडव ढोलताशा पथक व शिवसेना शाखा पारनाका यांच्या सहाय्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. कोरोना संबंधीत योग्य ती काळजी घेऊन तसेच नियमांचे पालन करून सदर रक्तदात्यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. तत्पूर्वी सदर ऱक्तदान शिबीराचे उद्घाटन आमची वसई रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास पुष्प अर्पण करुन रक्तदानासाठी सुरुवात केली. रक्तदानाच्या माध्यमातून वसईच्या राजाचे शुभाशिर्वाद शासनाच्या सोबत आहे असे मत भानुशे बंधूनी म्हटले. तब्येत सांभाळून व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून कोरोनावर मात करायची असे रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांनी म्हटले. रुद्रतांडव ढोलताशा पथक चे कुशल पाटील, स्वप्निल परुळेकर, विरेंद्र यादव व सहकाऱ्यांनी शिबीराचे नियोजन सुंदररीत्या केले.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget