मालवणी परिसर बीएमसी,पोलिसांकडून सील

मुंबई - ‘कोरोना’मुळे मुंबईत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचा राहता परिसर सील करण्यात आला आहे. मालवणी भागात कादरी मशीद परिसरात राहणाऱ्या ६५ वर्षीय रुग्णाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात उपचार सुरु असताना ३१ मार्च रोजी मृत्यू झाला.‘कोरोना’ग्रस्त रुग्णाच्या कुटुंबीयांना ‘कोरोना’ चाचणीसाठी नेण्यात आले आहे. बीएमसी आणि पोलिसांनी हा संपूर्ण परिसर सील केला आहे. ‘कोरोना’मुळे महाराष्ट्रात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा १२ वर पोहोचलेला आहे. मुंबईतील हा आठवा बळी आहे.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३२० पार गेला आहे. मुंबईत ८, तर नवी मुंबई, पुणे, पालघर आणि बुलडाण्यात प्रत्येकी एकाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला आहे. पालघरमध्येही ५० वर्षीय ‘कोरोना’ग्रस्ताचा मृत्यू झाल्याचे आजच समोर आले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget