मेघालयमध्ये आजपासून वाईन शॉप सुरु करण्याची परवानगी

शिलॉन्ग - देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र लॉकाडऊन सुरु असतानाच मेघालय सरकराने लोकांची मागणी पाहता राज्यात सोमवारपासून वाईन शॉप सुरु करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती देण्यात आली.वाईन शॉप सुरु केले तरी ग्राहकांना सोशल डिस्टंन्सिगं पाळण्याचं, एकमेकांपासून योग्य ते अंतर राखण्याच्या सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. या दरम्यान सर्वांनी हात स्वच्छ करण्यावरही भर देण्यात आला आहे.
आयुक्त प्रवीण बक्शी यांनी सर्व जिल्हा उपायुक्तांना पत्र लिहून याप्रकरणी राज्य सरकारच्या निर्णयाची सूचना दिली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत वाईन शॉप सुरु ठेवण्यास मंजूरी देण्यात आली आहे. यावेळी एकमेकांमध्ये सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचे आणि वारंवार हात स्वच्छ करण्याच्या सक्तीचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget