जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या वाहनातून रोकड, दारू जप्त

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या वाहनाची तपासणी करताना पोलिसांना त्यामध्ये ६ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम आणि मद्याच्या दोन बाटल्याही मिळून आल्याची माहिती आहे. यासंदर्भात बदनापूरचे पोलीस निरीक्षक एम. बी. खेडकर यांनी सांगितले,की याप्रकरणातील आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध दारूबंदीच्या कायद्यान्वये, सरकारी आदेशाचा भंग, संशयास्पद पैसा बाळगणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
औरंगाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते हे जालन्याकडे त्यांच्या सरकारी वाहनातून निघाले होते. शनिवारी दुपारी जालना-औरंगाबाद महामार्गावरील वरुडी फाटय़ावरील चेकपोस्टवर बदनापूर पोलिसांनी जिल्हा नाकेबंदीच्या अनुषंगाने डॉ. अमोल गिते यांचे वाहन अडवले. पोलिसांनी त्यांच्या वाहनाची तपासणी केली. या वेळी त्यांच्या वाहनामध्ये रोख सहा लाख ७० हजार व मद्याच्या दोन बाटल्याही आढळून आल्या. नाक्यावरील पोलिसांनी वाहनातील वस्तू आणि रकमेच्या अनुषंगाने पंचनामा करून यासंदर्भाने बदनापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मद्याच्या दोन बाटल्या व रक्कम व वाहन आदी मुद्देमाल जप्त केला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget