वरळीचे एनएससीआय स्टेडियम झाले क्वारंटाईन वॉर्ड

मुंबई - मुंबईत कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुंबई महापालिकेने आता संकटाचा सामना करण्याची तयारी सुरु केली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने अधिकाधिक लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी व्यवस्था केली जात आहे. मुंबईत वरळीतल्या एनएससीआय म्हणजे राष्ट्रीय क्रीडा संकुलाचे क्वारंटाईन वॉर्डमध्ये रुपांतर करण्यात आले आहे.कोरोनामुळे मुंबईतील जी दक्षिण प्रभागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. हा वॉर्ड कोरोनाचा हॉटस्पॉट मानला जात आहे. वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर आदी भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आणि त्यानंतर या भाग सील करून नागरिकांना पोद्दार रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले. परंतु,या भागात कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढत असल्याने जास्तीत जास्त लोकांना क्वारंटाईन करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे मुंबई महापालिकेनं नवे क्वारंटाईन वॉर्ड तयार करण्यास सुरुवात केली आहे.वरळीच्या एनएससीआय या मोठ्या इनडोअर स्टेडियमचे रुपांतर आता क्वारंटाईन वॉर्डमध्ये होणार आहे. तब्बल ५०० बेडची व्यवस्था या स्टेडियममध्ये केली जात आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget