करोनाविरुद्ध लढ्यात राजकारण नको – मुख्यमंत्री

मुंबई - संपूर्ण देश एकत्रपणे करोना विषाणूशी लढतोय. ही एकजूट सदासर्वदा अशीच कायम ठेवली पाहिजे. यात कोणतेही राजकारण करू नये. तसे झाल्यास निश्चितच देश आणि महाराष्ट्र करोनाच्या संकटावर मात करील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 
करोना संकटाशी लढा देत असताना केंद्राकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशंसोद्गार काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन हे सर्व राज्यांशी संवाद साधत आहेत. राज्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेत आहेत. आवश्यक असलेली मदत तातडीने केली जात आहे. या समन्वयाचा उल्लेख करत हा संवाद, ही एकजूट कायम ठेवल्यास आपण करोनाच काय कोणत्याही संकटावर मात करू शकतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. करोनाविरुद्ध लढ्यात आपल्याला कोणतेही राजकारण करायचे नाही. पक्षीय राजकारण थांबवून सर्वांनी एकजुटीने या संकटाला सामोरे जायला हवे, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे राज्यातील विरोधी पक्षाला टोला लगावला. 
आतापर्यंत महाराष्ट्राने धीरोदत्तपणे करोना संकटाशी सामना केला आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवत आला आहे आणि या संकटातही माहाराष्ट्र देशाला दिशा दाखवेल, असा विश्वास मुख्यमत्र्यांनी व्यक्त केला. नागरिकांना गडबडून, गोंधळून न जाण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. ही बंदी किती दिवस राहणार, हे आपल्याच हातात असल्याचे सांगताना शिस्त व्यवस्थित पाळली तर विषाणूची साखळी तुटेल याची जाणीवही त्यांनी करून दिली. 
१४ एप्रिलनंतर काय करायचे यावर काम सुरु आहे. त्याची माहिती मी आपणा सर्वांना १४ तारखेपर्यंत देईनच, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. धैर्य, संयम आणि वागण्यातील शिस्तच आपल्या सभोवतालच्या करोनाच्या शृखंला तोडणार असल्याचे ते म्हणाले. शक्यतो घराबाहेर पडू नका, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जावे लागले तरी गर्दी करू नका, मास्क लावूनच बाहेर जा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.परिस्थिती नियंत्रणात असली तरी अजिबात गाफील राहून चालणार नाही. राज्यातील नागरिकांनी स्वत:च स्वत:चा रक्षक होताना खबरदारी घ्यावी, आम्ही जबाबदारी घेतो, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget