मजुरांच्या खात्यात ७५०० रुपये भरण्याची सोनिया गांधींची सरकारकडे मागणी

नवी दिल्ली - केंद्र सरकारने देशातली सर्व गरीब आणि होतकरु मजुरांच्या बँक खात्यात तातडीने ७५०० रुपये जमा करावे, अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. मजुरांना अन्नाचा पुरवठा व्हावा यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, असंदेखील सोनिया गांधी म्हणाल्या. कॉंग्रेस कार्यकारी समितीची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही वारंवार सांगितले आहे की, टेस्टिंगवर काहीच पर्याय नाही. मात्र, तरीही देशात कोरोना टेस्टिंग फार कमी प्रमाणात होत आहेत. डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले जाणारे पीपीई किट्सदेखील चांगल्या गुणवत्तेचे नाहीत. आम्ही सरकारला अनेक सल्ले देत आहोत. मात्र, सरकार त्यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करताना दिसत नाही”, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला.लॉकडाऊनमुळे देशातील शेतकरी प्रचंड त्रस्त आहे. शेतकरी हतबल झाला आहे. त्यांच्या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करायला हवे. खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना मदत करायला हवी, अशीदेखील मागणी सोनिया गांधी यांनी यावेळी केली.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget