वाईन शॉप सुरु करण्याची राज ठाकरेंची आग्रही मागणी ; वाईन शॉप्सच्या मार्गाने राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल !

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरापासून देशात आणि राज्यातील अनेक उद्योग, व्यवसाय, कार्यालयं आणि दैनंदिन जीवनातील बहुतांश व्यवहार ठप्प झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाकडून काही उपाययोजनांचीही आखणी केली जात आहे. ज्यामध्ये त्यांना मित्रपक्षांचीही साथ मिळत आहे. यातच आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक जाहीर आवाहन केले आहे. 
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी काही निर्णय घ्यावेच लागतील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझे  जाहीर आवाहन, असे ट्विट करत या आवाहन पत्राची प्रत जोडली. ज्यामध्ये त्यांनी हॉटेल उद्योगांपासून वाईन शॉप्स उघडण्यापर्यंतच्या गोष्टींचा उल्लेख केल्याचे स्पष्ट झाले. 
राज्यात वाईन शॉप्स सुरु करण्याच्या मागणीवरुन बऱ्याच चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. काही निर्बंध ठेवत वाईन शॉप सुरु करण्याची चिन्ह मधल्या काळात दिसली होती. वाईन शॉप सुरु करण्याचा हाच मुद्दा मांडत राज ठाकरे यांनी आग्रही सूर आळवल्याचे पाहायला मिळाले. आणखी किती दिवस ही परिस्थिती पुढे अशीच सुरु राहील याची काहीच खात्री नाही. राज्याच्या तिजोरीवर येणारा बोजा अधओरेखित केला. तर, या परिस्थितीमध्ये वाईन शॉप्स सुरु करुन राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला हरकत काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 
वाईन शॉप सुरु करणे म्हणजे दारु पिणाऱ्यांचा विचार करणे असे नसून, राज्याच्या महसुलाचा विचार गरजेचा असल्याचे सांगत या प्रश्नाचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. सध्याच्या घडीला राज्याचा आटलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये राज्याची परिस्थिती पाहता वाईन शॉप्सच्या मार्गाने येणारा महसूल मोठा आहे यावर त्यांनी भर दिला.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget