कोरोना व्हायरस; झोपु, म्हाडा प्राधिकरणाकडून २६०० घरे

मुंबई - करोनाचा प्रादुर्भाव वाढलाच तर विलगीकरणासाठी मोठय़ा प्रमाणात सदनिकांची गरज लक्षात घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण तसेच म्हाडाकडे मागणी करण्यात आली आहे. या नुसार या दोन्ही यंत्रणांनी तूर्तास २६०० घरे उपलब्ध करून दिली आहेत. गरज भासल्यास ही घरे जिल्हाधिकाऱ्यांकडून ताब्यात घेतली जाणार आहेत.उपनगरात करोनाचा प्रादुर्भाव वाढला तर विलगीकरणासाठी आवश्यक खाटा इस्पितळांमध्ये उपलब्ध नसल्यामुळे ही व्यवस्था करण्यात आली आहे. या संदर्भात अलीकडेच महापालिका आयुक्तांनी आदेश जारी केला होता. या आदेशानुसार रिक्त असलेल्या सदनिका विलगीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात याव्यात. या सदनिकांना निवासयोग्य प्रमाणपत्र मिळालेले नसले तरी अशा सदनिका ताब्यात घेऊन तेथे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. मुंबई महानगर परिसरात रिक्त असलेल्या व विकल्या न गेलेल्या दोन लाख दहा हजार सदनिका आहेत. त्यापैकी ६० टक्के सदनिका मुंबईत आहेत. या सर्व सदनिका प्रामुख्याने खासगी विकासकांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याशीही उपनगर जिल्हाधिकारी चर्चा करीत आहेत. यापैकी काही विकासकांनी सदनिका देण्याची तयारी दाखविली आहे तर काहींनी अर्धवट अवस्थेत बांधकामे असल्यामुळे सदनिका देण्यात अडचण असल्याचे सांगितले आहे.
म्हाडाने सदनिकांची यादी सादर केली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून विलगीकरणासाठी आणखी सदनिकांची आवश्यकता आहे. खासगी विकासकांशी बोलून त्यांची घरेही ताब्यात घेण्यात येणार असल्याचे या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget