खेडमध्ये खासगी डॉक्टरवर गुन्हा दाखल

रत्नागिरी - खेडमध्ये बुधवारी मृत झालेल्या कोरोनाबधित रुग्णावर यापूर्वी उपचार करणाऱ्या एका खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. जावेद महाडिक असे या डॉक्टरचे नाव आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी सापडलेल्या कोरोना रुग्णाचा खेडमधील कळंबणी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.हा रुग्ण दुबईतून आला होता. मात्र, या कोरोनाबाधीत रुग्णाची माहिती लपवल्याप्रकरणी खेडमधील डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर जावेद महाडिक असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. खेड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. रुग्ण परदेशातून आलेला आहे हे माहीत असताना, तसेच त्याला कोरोना संसर्गजन्य लक्षणे असताना प्रशासनाला जाणीवपूर्वक न कळवता कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा संभव असलेली कृती केल्याप्रकरणी तसेच लोकसेवकांच्या आदेशाची अवज्ञा केल्याप्रकरणी डॉ. जावेद महाडिक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.द.वी कलम 279,270,188 अन्वये खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget