नाशिकमध्ये मालेगाव ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट

नाशिक - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२ वर पोहोचली असून एकट्या मालेगावात ३७ कोरोना बाधित रुग्ण आहेत. यामुळे प्रशासनाने मालेगावमध्ये अधिक कडक नियम लागू केले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे.संपूर्ण देशात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असताना नाशिक जिल्हा मात्र यापासून काही दिवस दूर होता. नाशिक जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण हा लासलगाव येथे मिळून आल्या नंतर प्रशासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागली. यानंतर मालेगावमध्ये एकाच दिवशी तब्बल पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आणि मग प्रशासन खडबडून जागे झाले.मालेगाव शहरातील दाट वस्ती बघता ये थे कोरोना विषाणूचा प्रसार अधिक होऊ शकतो हे लक्षात घेता येथील संचारबंदीचे नियम अधिक कडक करून कोरोनाबाधित रुग्ण मिळून आलेल्या ठिकाणच्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.पालकमंत्री छगन भुजबळ,कृषी मंत्री दादा भुसे यांनी ह्या ठिकाणी मालेगावात येऊन आढावा घेऊन आरोग्य आणि पोलीस यंत्रणेला सूचना दिल्या.मात्र,असे असले तरी मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात ४२ कोरोना बाधित रुग्ण असून यापैकी ३७ रुग्ण एकट्या मालेगावातील आहेत. प्रशासनाने मालेगावसाठीचे लॉकडाऊनचे नियम अधिक कडक केले आहेत. मालेगावात बाहेरून कोणी ही नागरिक येऊ शकत नाही आणि मालेगावातून बाहेर देखील जाऊ शकत नाही. अशा पध्दतीचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येऊन सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत.


Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget