लॉकडाऊन संपेपर्यंत एसटीची सेवा सुरू होणार नाही - अनिल परब

रत्नागिरी - लॉकडाऊनच्या काळात एसटीला आतापर्यंत ७ लाख कोटी रूपयांचा तोटा झाल्याची माहिती परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. शिवाय, लॉकडाऊन संपेपर्यंत एसटीची सेवा सुरू होणार नाही. केवळ अत्यावश्यक सेवांसाठी एसटीची सुविधा सुरू असेल अशी माहिती अनिल परब यांनी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 
यावेळी खासदार विनायक राऊत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक देखील उपस्थित होते. दरम्यान, सध्या एसटीची अवस्था फार चांगली नसल्याचे देखील अनिल परब यांनी म्हटले आहे. 
पालकमंत्र्यांनी घराबाहेर पडून काम करणे अपेक्षित आहे. पण पालकमंत्री घरात असल्याची टिका राम कदम यांनी केली. दरम्यान, त्यांच्याकडे सध्या तेलढेच काम असल्याची प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget