मलायकाशी लग्न करण्याचा प्लान आहे का ? चाहत्याने विचारला प्रश्न अर्जुनने दिले उत्तर

मुंबई - कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जग ठप्प झालं आहे. त्यामुळे नेहमीच बीझी असणारे बॉलिवूड सेलिब्रेटींकडे सुद्धा बराच रिकामा वेळ आहे. त्यामुळे सध्या सगळेच सोशल मीडियावर बरेच सक्रिय झाले आहेत. इन्स्टग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. अशात अभिनेता अर्जुन कपूरला एका लाइव्ह चॅटमध्ये एका चाहत्याने मलायकाशी लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला. त्यावर अर्जुनने अगदी धम्माल उत्तर दिले. तो म्हणाला, जेव्हा मी लग्न करेन तेव्हा तुम्हाला सर्वांना नक्की सांगेन. सध्या तरी काही प्लान नाही आहे आणि समजा असेलच तरीही आता कसे लग्न करणार? सध्या तरी लग्नाचा कोणताही प्लान नाही. पण जेव्हा लग्न करायचे असेल तर कोणापासून काहीही लपवणार नाही. 
मलायका आणि अर्जुन यांच्या लग्नाबाबत आतापर्यंत अनेक अफवा पसरल्या आहेत. मात्र प्रत्येक वेळी अर्जुनने अद्याप तरी मलायकाशी लग्न करण्याचा कोणताही प्लान नाही हे स्पष्ट केले आहे. सध्या त्यांचे नाते = ज्या ठिकाणी आहे त्यात ते दोघेही खूश आहेत असे त्याने म्हटले आहे. पण त्यांच्या चाहत्यांना मात्र त्यांच्या लग्नाबाबत बरीच उत्सुकता असलेली पाहायला मिळत आहे. 
मागच्या दोन वर्षांपासून मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत आहेत. सुरुवातीच्या काळात या दोघांनीही त्यांचे नाते लपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेवटी त्यांनी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली देऊन टाकली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget