मुंबईत 'जी दक्षिण'मध्ये एका दिवसात ५२ नवे कोरोना रुग्ण


मुंबई - मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्तांचा आकडा १,७५३ वर गेल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.मुंबईतील अतिगंभीर वॉर्डची संख्या एका दिवसात पाचवरुन नऊवर गेली आहे. ‘जी दक्षिण’ प्रभागात एका दिवसात ५० पेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. मुंबईत १४ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार १,७५३ कोरोनाग्रस्त असून ‘जी दक्षिण’मध्ये सर्वाधिक म्हणजे ३६० रुग्ण आहेत. कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ८५ पेक्षा अधिक गेल्यास तो ‘अतिगंभीर’ विभाग मानला जातो. त्यानुसार, जी दक्षिण, ई, डी, जी उत्तर, एच पूर्व, एम पूर्व, के पूर्व, के पश्चिम आणि एल हे नऊ वॉर्ड अतिगंभीर ठरतात.
‘जी दक्षिण’ प्रभागात एका दिवसात तब्बल ५२ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ‘डी’ वॉर्डमध्ये २३ नवे रुग्ण आढळले आहेत. चार प्रभागांमध्ये कालच्या दिवसात एकही रुग्ण सापडलेला नाही, ही काहीशी दिलासादायक बाब आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget