पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

नवी दिल्ली - आज देशभरात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. भीमराव(बाबासाहेब) आंबेडकरांची १२९वी जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन केले.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. आंबेडकरांनी समता आणि न्याय या दोन मुल्यांच्या आधारांवर समाजाची रचना करण्यात योगदान दिले. भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकाराला माझे वंदन. त्यांनी शिकवलेली मुल्यांपासून प्रेरणा घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करु, असे ट्विट कोविंद यांनी केले.
देशाच्यावतीने बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. त्यांनी एक व्हिडिओही ट्विट केला आहे. स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी देशाला नवी दिशा देण्याचे उद्दीष्ट भारतीयांना दिले. ते मानवतेचे खंदे समर्थक होते. त्यांनी कायम समानतेचा पुरस्कार केला आणि त्यासाठी लढा दिला. बाबासाहेब आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहेत, असे या व्हिडिओमध्ये पंतप्रधान म्हणत आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget