रि-टेलिकास्ट 'रामायण'चा पहिल्याच आठवड्यात TRP रेटिंगमध्ये इतिहास

मुंबई - लॉकडाउनमुळे काही दिवसांपूर्वीच रामायण पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आलं आणि याला प्रेक्षकांचा पूर्वीसारखाच प्रचंड प्रतिसाद मिळाला.रामायणाचे प्रसारण झाल्यानंतर अवघ्या ४ एपिसोड्सना १७० मिलियन व्ह्यूवर्स मिळाले आहेत. मागच्या आठवड्यात ओपनिंग एपिसोडला ३४ मिलियन तर त्याच रात्री रिपिट एपिसोडला ४५ मिलियन व्ह्यूवर्स सोबतच ५.२%रेटिंग मिळाली. रामायण सुरू झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी शो परफॉर्मन्स आणखी चांगला झालेला दिसून आला. रविवारी सकाळी ४० मिलियन तर रात्री ५१ मिलियन व्ह्यूवर्स मिळाले.बार्क चीफ एक्झिक्यूटिव्ह सुनील लुला यांनी सांगितले की, रामायणला ज्या प्रमाणात रेटिंग मिळत आहे ते आश्चर्यकारक आहे. रामायण रि-टेलिकास्ट करण्याचा निर्णय योग्य होता. प्रेक्षकांचं आजही या शोवर तेवढंच प्रेम दिसून येत आहे. याआधी पीआयबीनं ट्विट करुन रामायणच्या सक्सेसबद्दल माहिती दिली होती. त्यांनी लिहिले बार्कच्या माहितीनुसार, दूरदर्शनवर रामायणला रि-टेलिकास्टनं हिंदी जनरल एंटरटेनमेंट चॅनेल शो विभागात २०१५ नंतर आता पर्यंतचं सर्वांधिक रेटिंग मिळालं आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget