APMC मार्केटमधील १२ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण ;एपीएमसी प्रशासनाने नेमले खासगी बॉडीगार्ड

नवी मुंबई - एपीएमसी मार्केटमध्ये नुकतेच १२ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मार्केटमध्ये चिंतेचा विषय बनला होता. १२ सुरक्षारक्षकांना कोरोना झाल्यानंतर एपीएमसी प्रशासनाने आता खासगी बॉडीगार्ड नेमले आहेत. तसेच मार्केटमध्ये गेल्या काहीदिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे .नवी मुंबई महानगरपालिकेच्या ताज्या आकडेवारीनुसार एपीएमसी मार्केटमध्ये काम करणारे किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित ५९० कोरोनाबाधित प्रकरणे आहेत. अशा कठीण परिस्थितीत एपीएमसीच्या नियमित १२ सुरक्षारक्षकांची चाचणीही पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाने खबरदारी न घेता थेट खासगी सुरक्षारक्षकांची निवड केली आहे. या खासगी सुरक्षारक्षकांना (बाऊन्सर) नियमित सुरक्षारक्षकांच्या पगाराच्या दुप्पट रक्कम देऊन त्यांना मार्केटमध्ये तैनात केले आहे.
खासगी बाऊन्सर तैनात करण्याबाबत एपीएमसीचे सुरक्षा अधिकारी अविनाश काकडे म्हणाले, कोरोना विषाणूची पॉझिटिव्ह चाचणी आलेल्या आमच्या १२ सुरक्षकांव्यतिरिक्त, लॉकडाऊन कालावधीत गैरहजर राहिलेल्या ४२ सुरक्षारक्षकांना प्रशासनाने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडे परत पाठविले आहे. त्यामुळे खासगी बाऊन्सर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.मात्र एपीएमसीमध्ये पोलीस आणि होमगार्ड याआधीच तैनात केले गेले आहेत, तर खासगी सुरक्षेच्या कामावर पैसे का घालायचे, असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते अनारजित चौहान यांनी विचारला आहे.Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget