‘एपीएमसी’त भाजीची आवक घटली

नवी मुंबई - १४ जणांना करोना विषाणूची लागण झाल्याने भाजीची वाहतूक करणारी अर्ध्याहून कमी वाहने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजी बाजारात दाखल झाली. शनिवारपासून भाजी बाजारातील व्यापाऱ्यांनी तुरळक भाजीची मागणी कमी करण्याचा निर्णय घेतल्याने बाजारात ‘बंद’चे स्वरूप असेल, असे चित्र आहे. 
देशभरात जाहीर केलेल्या टाळेबंदीची मुदत सोमवार, ४ मे रोजी संपुष्टात येत आहे. मात्र, करोनाबाधितांचा आकडा अधिक असल्याने मुंबई महानगर क्षेत्रात टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बाजारात सध्या व्यापारी, काही माथाडी, मापाडी, वाहतूकदार आणि सर्वाधिक खरेदीदार अशी गर्दी होत आहे. दर दिवशी पाच ते सहा हजार घटकांची रेलचेल होते. मात्र, व्यापाऱ्यांनी गुरुवारी शेतमालाची कमी मागणी नोंदविल्याने भाजी वाहनांची संख्या निम्म्यावर आली होती. भाजी बाजारात खरेदीदारांची गर्दी होत आहे. ही खरेदी नागरिकांच्या सेवेसाठी नसून नफा कमावण्यासाठी आहे, असा आरोप काही व्यापाऱ्यांनी केला आहे. एखाददुसरा खरेदीदार पोलिसांच्या भीतीने काही काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करतो. मात्र, पोलिसांची पाठ फिरताच टाळेबंदीचे नियम धाब्यावर बसवले जातात. त्यामुळे व्यापारी वर्ग चिंतित आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget