महापालिका आयुक्तांची पहिल्याच दिवशी धारावीत पाहणी

मुंबई - मुंबई महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी शनिवारी सकाळपासूनच रस्त्यावर उतरून पाहणी करण्यास सुरुवात केली. करोनाचे रुग्ण असलेले नायर रुग्णालय आणि सर्वाधिक रुग्ण असलेल्या धारावी परिसरात त्यांनी पाहणी केली.केवळ ऑनलाइन संवाद साधण्यापेक्षा नवनियुक्त पालिका आयुक्तांनी मैदानात उतरून पाहणी करणे, आढावा घेणे, रुग्णांशी आणि सर्वसामान्यांशी संवाद साधणे आदी मार्ग अवलंबल्यामुळे पहिल्याच दिवशी त्यांच्याविषयी चर्चा होती. 
मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांनी शनिवारी स्वीकारला. अश्विनी भिडे सनदी सेवेतील १९९५ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांना २४ वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये सहसचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एम.एम.आर.डी.ए.) अतिरिक्त आयुक्तपद, तसेच शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या सचिव म्हणूनही भिडे यांनी काम पाहिले आहे. त्याचबरोबर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget