महाराष्ट्राकडे खंबीर नेतृत्वच नाही - पीयूष गोयल

नवी दिल्ली - देशात सध्या करोनाचं संकट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातही करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत उद्योगधंदे ठप्प झाल्याने काही कामगारांनी आपल्या राज्याची पायी वाट धरली होती. मात्र नंतर सरकारने त्यांच्यासाठी रेल्वेसेवा सुरू करत त्यांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबत बोलताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रात प्रशासन कोलमडले आहे आणि राज्यात नेतृत्वाची कमतरता असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्र सरकारने श्रमिक रेल्वेगाड्यांची संख्या कमी असल्याच्या केलेल्या आरोपाचे गोयल यांनी खंडन केले.करोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधीही माझ्याशी संपर्क साधला नाही. याव्यतिरिक्त ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे मुख्य सचिव आणि नोडल अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिले.
यासंदर्भात मी वाहिन्यांवर टीका होत असल्याचे पाहिले. त्यानंतर मी महाराष्ट्राला त्वरित १२५ रेल्वेगाड्या पाठवण्याचा निर्णय घेतला. तसेच आम्हाला त्वरित यादी मिळावी यासाठी राज्य सरकारला यादी तयार ठेवण्याचीही विनंती केली. महाराष्ट्राला हव्या तेवढ्या रेल्वेगाड्या पुरवण्याची आमची तयारी आहे. परंतु सरकारडे यादी तयार नाही ही वाईट बाब आहे. सध्या हे श्रमिक प्रवासी कुठे आहेत याबाबतही माहिती नाही. महाराष्ट्र आणि मुंबईचे वास्तव प्रत्येकासमोर आहे. असे गोयल म्हणाले. रेल्वे प्रशासानानं सोमवारी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारकडे कोणत्या रेल्वेगाड्या हव्या आहेत यासाठी यादी सोपवण्याची विनंती केली. परंतु राज्य सरकारकडून कोणतेही उत्तर मिळालं नाही,असा दावा त्यांनी केला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget