उत्तर प्रदेशमध्ये पायी जाणाऱ्या सहा मजुरांना बसने चिरडले

मुझफ्फरनगर - उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथून बुधवारी रात्री एका भरधाव जाणाऱ्या बसने पायी घरी जाणाऱ्या मजुरांना चिरडले. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जखमी झाले आहेत. त्यातील काहीजणांची प्रकृतीही गंभीर आहे. रस्त्याच्या बाजुने हे मजूर आपल्या घरी चालले होते. लॉकडाऊनमुळे वाहन नसल्याने हे मजूर रस्त्याने पायी जात होते.
रात्री उशिरा पंजाबहून पायी आपल्या गावी परत होते. हे कामगार सिटी कोतवाली भागात पोहोचले होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव बसने त्यांना चिरडून टाकले. या अपघात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व कामगार मूळचे बिहारचे असून ते पंजाबहून पायी घरी परतत होते.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget