मीरा-भाईंदरमध्ये कोरोना रुग्णात झपाट्याने वाढ

भाईंदर - मीरा-भाईंदर परिसरात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबई करोनाच्या हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईला लागूनच असलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीत करोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, मीरा-भाईंदरमधील रुग्णांचा आकडा २३५ वर पोहोचला आहे.यातील २६ जण बाधितांच्या संपर्कात असल्यामुळे पॉझिटिव्ह आले आहेत. तर, अन्य ९ जणांना नव्यानं लागण झाली आहे. मीरा-भाईंदर परिसरात एका दिवसात इतके रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यात काशीमीरा येथील एका १४ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.मागील महिन्याच्या २० तारखेपासून मीरा-भाईंदरमध्ये कठोरपणे लॉकडाऊन राबवण्यात येत आहे. तरीही रुग्ण वाढतच आहेत. एकूण २३५ रुग्णांपैकी १२७ जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget