मंत्र्यांनी नवी गाडी खरेदी करु नये - योगी आदित्यनाथ यांचे आदेश

लखनऊ - कोरोनामुळे देशातील सर्वच राज्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सर्वच राज्य प्रयत्न करत आहेत.सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळून जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना परवानगी देण्यात आल्या आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही महत्वाच्या सूचना राज्य मंत्री मंडळाला केल्या आहेत. खर्च वाचवण्यासाठी यावर्षी कोणते नवे वाहन खरेदी केले जाऊ नये असे स्पष्ट आदेशच त्यांनी दिले आहेत.गरज नसताना नव्या योजना, नवे काम सुरु करु नये असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. नव्या तंत्रज्ञानामुळे अनेक पद रिक्त झाली आहेत. सरकार ही पद पूर्णपणे बंद करणार आहे. अधिक मिटींग या व्हिडीओ कॉन्फरन्सवर होतील. कोणताच अधिकारी बिझनेस क्लासने प्रवास करणार नाही. इकॉनॉमिक क्लासच्या प्रवाशांना सवलत दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. 
केंद्र सरकारच्या अनेक योजनांमध्ये राज्य सरकारांना आपला वाटा द्यावा लागतो. यापुढे एकरकमी पैसे न देता हफ्त्याने दिले जातील. कोणती नवी योजना आणण्यात येणार नाही. गरजेच्या नसलेल्या योजनांना स्थगिती देण्यात येणार आहे. जे काम सध्या सुरु असेल ते कमी खर्चात केले जाईल. कोणतेही नवीन काम घेतले जाणार नाही असे योगींनी सांगितले. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget