मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची 'फोन पे चर्चा'

नवी दिल्ली - महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर सुरु झालेल्या उलटसुलट चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना फोन करून सरकारमध्ये काँग्रेसचा सन्मान राखला जाईल, असे आश्वासन दिले. तर कोरोनाविरोधी लढ्यात काँग्रेसचे पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
राजकीय वर्तुळात सुरु झालेल्या उलटसुलट चर्चेनंतर आघाडीतील नेत्यांनीही याबाबत सारवासारव करताना महाराष्ट्रात काँग्रेसचे नव्हे, तर महाविकास आघाडीचे सरकार असल्याचा खुलासा केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फोन करून संवाद साधला.शिवत राहुल गांधी यांनीही त्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेतील व्हिडिओ ट्वीट करून महाराष्ट्र सरकारबाबत अविश्वास दाखवला नव्हता असे स्पष्ट केले.राहुल गांधी म्हणाले होते, मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि त्याकडे लोकांचे लक्ष आहे. तिथे कठीण परिस्थिती आहे आणि केंद्राने या राज्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला होता. तर राहुल गांधी यांनीही त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे ट्वीट करून सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी व्हिडिओदेखिल ट्वीट केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून झालेली चर्चा पाहता दोन्ही पक्षांकडून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget