राज्यपालांची बदनामी; वेब पोर्टलविरोधात तक्रार दाखल

मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बदनामी केल्याप्रकरणी एका वेबपोर्टल विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस ठाण्यात राज्यपाल कार्यालयाकडून ही तक्रार दाखल करण्यात आली. मागील महिन्यात एका मॉडेलला लष्कराच्या हेलिकॉप्टरने महाराष्ट्रातून डेहराडून येथे जाण्यास परवानगी दिल्याची बातमी या पोर्टलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली होती.
मात्र राज्यपाल कार्यालयाकडून अशी कोणतीही परवानगी दिली नसताना बदनामी करण्याच्या उद्देशाने बातम्या प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget