अम्फानचा तडाखा ; काहींचा मृत्यू, लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

कोलकाता - भारताच्या पूर्व किनारपट्टीला चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. आतापर्यंत १० ते १२ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती आहे. सुपर सायक्लोन अम्फान या वादळासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पाच लाख आणि ऑडिशात 1,58,640 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.सुपर सायक्लोन अम्फान दक्षिण पश्चिमेकडील दीघा किनारपट्टीला धडकले आहे. या धडकेनंतर काहीवेळातच चक्रीवादळाने आपले रौदरुप दाखवले.पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथील काही लोकांना आपल्या जीव गमवावा लागला आहे. 
पश्चिम बंगालमध्ये अम्फान वादळात जवळपास १० ते १२ लोकांना मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. उत्तर आणि दक्षिण २४ परगनात मोठी हानी झाली आहे. कोलकातामध्ये वादळाचा तडाखा बसला. या वादळातून सावरण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget