नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नांदेड - जिल्ह्यात एका नराधमाने आपल्या मुलीच्या अल्पवयीन मैत्रीणीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नायगाव तालुक्यातील बडबडा शिवारात शुक्रवारी ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाजी हनमंते, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की पीडित मुलगी आपल्या घरासमोर थांबली असताना तिच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीचे वडील सोनाजी हनमंते याने शेतात त्या मुलीली ज्वारी कापणीसाठी येण्यास सांगितले. तसेच त्या बदल्यात ज्वारी देतो, असे सांगितले. तर ज्वारी कापताना तिची मैत्रिणही सोबत येणार असल्याचे सांगतिले. त्यावेळी पीडीत मुलीने ज्वारी कापण्यासाठी होकार दिला.त्यानुसार पीडित मुलगी तीची मैत्रीण आणि आरोपी सोनाजी हनमंते हे तिघे ज्वारी कापणीला गेले. दुपारी तिघांनी मिळून जेवण केले. मात्र, पाणी संपल्याचे सांगून सोनाजी याने आपल्या मुलीला शेजारी शेतातून पाणी आणायला पाठविले. यावेळी पीडित मुलगीही पाणी आणण्यासाठी मैत्रीणिसोबत जाण्यासाठी निघाली असता, त्याने तिला जाऊ दिले नाही. तोपर्यंत आपण ज्वारी कापण्यास सुरवात करू, असे म्हणून पीडित मुलीला शेतात नेऊन जबरीने अत्याचार केला. तसेच याबद्दल कोणाला काही सांगितले, तर तुझ्या कुटुंबीयांना ठार मारेन, अशी धमकी दिली.पीडित मुलीची मैत्रीण येताच तिने घडलेला प्रकार तिला सांगितला. भयभीत झालेल्या मुलीनेही तिला सोबत घेऊन घर गाठले. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी विरोधात कुंटुर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget