कोरोनाचा कहर ;औरंगाबाद कोरोनाचा नवा हॉट्स्पॉट

औरंगाबाद - राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाने थैमान घातले असून औरंगाबादेत आणखी २४ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता कहर पाहायला मिळत आहे.औरंगाबादमध्ये आज दिवसाच्या सुरुवातीलाच २४ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा हा ६५१ वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.
दरम्यान औरंगाबादेत काल दिवसभरात तब्बल ६९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यातील १८ जण हे १७ वर्षावरील कमी वयोगटाची आहेत. यात जवळपास ८ मुले आणि ९ मुलींचा समावेश आहे. तर ५ मुले ही १० वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. औरंगाबादेत सोमवारी ६९, तर रविवारी ५० नवे रुग्ण आढळले होते.औरंगाबादमध्ये १५ मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. या रुग्णानंतर कोरोनाबाधितांचा आकड्यात काहीशी वाढ होत होती. मात्र गेल्या २० दिवसात हा आकडा प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठं आवाहन प्रशासनापुढे आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget