केंद्राच्या पॅकेजवर ममता बॅनर्जींची नाराजी

कोलकाता - 'अम्फान' या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालचे १ लाख कोटींची नुकसान झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांचा हवाई दौरा करून पाहणी केली. तसेच, त्यांनी पश्चिम बंगालला केंद्राकडून १ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात १ लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले असताना केंद्राकडून फक्त १ हजार कोटींची मदत जाहीर झाल्याने त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी पश्चिम बंगालच्या समुद्र तटावर धडकलेल्या अम्फान या चक्रीवादळामुळे तडाखा बसलेल्या भागाची शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी पाहणी केली. यावेळी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील उपस्थित होत्या. हा दौऱ्यानंतर पंतप्रधानांनी राज्याला १ हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. यावर शनिवारी बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चक्रीवादळामुळे, जवळपास ८० जणांचा बळी गेला, हजारो नागरिक बेघर झाले. राज्याचे जवळपास १ लाख कोटींचे नुकसान झाले आणि केंद्राकडून फक्च १ हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ममता यांनी दक्षिण परगनातील सर्वाधिक जिल्ह्यांमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नंतर त्यांनी जिल्हा अधिकारी व जीर्णोद्धाराच्या कामात गुंतलेल्या संस्थांशी बैठक घेतली. आम्ही आधी कोरोना संसर्गाचा सामना करतोय, परराज्यातील मजूरही राज्यात परत येत आहेत. अशातच 'अम्फान' चक्रीवादळ येऊन धडकले, आणि आम्ही त्या परिस्थिशीही दोन हात करत आहोत. या घटनेत राज्यातील २९ भागातील ७६ हुन अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. या सर्व परिस्थीतीची पाहणी सुरू असून याबाबत आपण पंतप्रधान मोदी यांना चक्रीवादळाच्या परिस्थितीनंचरची सर्व माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले.'पंतप्रधान मोदी यांनी १ हजार कोटींच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु, या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. ही मदत कधी आणि कोणत्या स्वरुपात मिळेल हे देखील अस्पष्ट आहे. आम्ही याविषयी नंतर ठरवू. त्यांना किती निधी द्यायचा आहे ते ठरवतील. सध्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या चक्रीवादळामुळे झालेले नुकसान हे १ लाख कोटीहून अधिकचे आहे. आम्ही त्यांना याबाबत सर्व माहिती देणार आहोत', असेही त्या यावेळी म्हणाल्या.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget