रायगडमधील ज्येष्ठ शिवसैनिकाची हत्या

रायगड - रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ शिवसैनिक गणपत मांढरे यांना रविवारी रात्री हत्या झाली. ते ५५ वर्षांचे होते.पोलादपूर तालुक्यातील माटवण येथे ही घटना घडली.तर मांढरे यांच्या कुटुंबीयांनी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. गणपत मांढरे यांची हत्या कशामुळे झाली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. 
प्राथमिक माहितीनुसार, राजकीय वैमन्यस्यातून हि हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे आतापर्यंत ४० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गावाबाहेरील शिवमंदिरासमोर लाठ्या काठ्यांनी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर गावात सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सध्या मांढरे यांचा मृतदेह पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे . दरम्यान जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget