जगात वेगाने पसरतोय अफवा व्हायरस - विद्या बालन

मुंबई - सध्या जगभरात सध्या कोरोना व्हायरसनं थैमान घातले आहे. दिवसेंदिवस या व्हायरसचे संक्रमण वाढत चालले आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी या व्हायरसच्या लढाईत आपापले योगदान देत आहेत. कोरोना व्हायरस संबंधी शक्य तेवढी जागरुकता पसरण्याचे काम करत आहेत. पण अशात अभिनेत्री विद्या बालनने नुकतीच जगभरात पसरत असलेल्या एका नव्या व्हायरसची माहिती दिली आहे. या संबंधीत एक व्हिडीओ विद्याने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या आधी अभिनेता मानव कौलने सुद्धा यासंबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. 
विद्या बालनने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओमध्येही मानव कौल सुद्धा दिसत आहे. या व्हिडीओमध्ये विद्या बालन सांगते, जगात कोरोना व्हायरस व्यतिरिक्त आणखी एक व्हायरस वेगाने पसरत आहे. मानव कौलने या व्हायरसचं नाव अफवा व्हायरस असे सांगितले आहे. तो सांगतो, मेडिकल रिपोर्टनुसार हा अफवा व्हायरस फोनचं फॉरवर्ड बटण दाबल्याने पसरतो. या व्हायरसची लक्षणे तर अनेक आहेत पण जास्तीत जास्त केसेसमध्ये UNESCO, SCRIPTURES, NASA, NUMEROLOGY हे शब्द वापरलेले दिसून येतात.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget