शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी बेवारस मृतदेहावर केला अंत्यसंस्कार

औरंगाबाद - कोरोना व्हायरसच्या साथीमुळे सध्या बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला कुणीही धजावत नाही. मात्र औरंगाबादमध्ये शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन माणुसकीचे दर्शन घडवले आहे.औरंगाबादमध्ये दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा मृतदेह एका हॉटेलमध्ये आढळला होता. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे या तरुणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास कुणीही तयार नव्हते. मात्र त्याचवेळी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
विशेष म्हणजे या मृतदेहाला मुखाग्नीसुद्धा अंबादास दानवे यांनीच दिला. या घटनेमुळे अंबादास दानवे यांच्यातील संवेदनशीलतेचं कौतुक केले जात आहे. अंबादास दानवे हे सध्या शिवसेनेच्या तिकिटावर विधान परिषदेचे सदस्य आहेत.अंबादास दानवे यांच्यामार्फत अंत्योदय योजने अंतर्गत बेवारस व्यक्तींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. या योजने अंतर्गत आतापर्यंत १७५ हून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.अंबादास दानवे यांनी लॉकडाऊनच्या काळातही बेवारस व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले आहेत. एप्रिल महिन्यात एका बेवारस वृद्धेचा मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह घाटी रुग्णालयात पडून होता. मात्र कुणीही अंत्यसंस्कार करण्यास समोर आले नव्हते. त्यावेळीही आमदार अंबादास दानवे यांनी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले होते. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget