पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. १७ मेपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन असल्याने त्यापुढे काय रणनीती आखायची, अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी काय उपाययोजना करायच्या, याविषयी मोदी सर्व मुख्यमंत्र्यांची मतं जाणून घेणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांची बैठक आज दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची पाचव्यांदा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा होणार आहे.सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना यावेळी आपले मत मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ही आतापर्यंतची सर्वात दीर्घकाळ चालणारी बैठक ठरु शकते. कोरोनाच्या परिस्थितीचा राज्यनिहाय आढावा घेण्याबरोबरच मरगळलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात सुरुवातीला २५ मार्च ते १४ एप्रिल असा २१ दिवसांचा पहिला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवला होता. तर केंद्रीय गृहमंत्रालयाने १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती. आता टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल होणार, की पुन्हा कालावधी वाढणार, याकडे देशातील नागरिकांचे लक्ष लागून आहे
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget