प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण प्रकरणी बसपाच्या माजी खासदाराला अटक

लखनऊ - जौनपूर शहरातील पचहटिया येथील निर्माणाधीन सीव्हर ट्रीटमेंट प्लांटच्या प्रकल्प व्यवस्थापकाचे बसपाचे माजी खासदार आणि बाहुबली धनंजय सिंह, त्यांचे निकटवर्तीय विक्रम सिंह यांच्यासह चार जणांनी अपहरण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. लाईन बाजार पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कालिकुट्टीचे माजी खासदार यांच्या निवासस्थानी पोहोचले. या माजी खासदाराला तेथून अटक करण्यात आली. त्याचबरोबर दुसरा आरोपी विक्रम सिंग यालाही अटक करण्यात आली.दोघांनाही कोर्टात हजर राहण्यासाठी लाईन बाजार पोलीस ठाण्यात कडक सुरक्षेत ठेवण्यात आले होते. रिमांड दंडाधिकाऱ्याने धनंजय सिंग यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी, आजार असल्याचा युक्तिवाद करत माजी खासदाराने दिलासा मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला दंडाधिकाऱ्यांनी नकार दिला. कारागृह अधीक्षकांना या आजाराशी संबंधित अर्ज पाठवून उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितले आहे, असे त्यांनी सांगितले.
कोर्टाबाहेर धनंजय सिंह यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारचे मंत्री गिरीशचंद यादव यांनी कराराच्या वादात वैयक्तिक कट रचल्याचा आरोप केला. यासह त्यांनी एसपी देखील या काटकारस्थानात हात आहे. शहरातील पचहटिया भागात कोट्यवधींच्या खचार्ने सीव्हर ट्रीटमेंट प्लांटचे बांधकाम सुरू आहे. कार्यकारी महामंडळ जल निगम यांनी मुझफ्फरनगरच्या सिंघल ग्रुपला बांधकाम करण्याचे काम सोपवले आहे. कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक अभिनव सिंघल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, विक्रम सिंह दोन लोकांसह ४ मे रोजी त्यांच्या ठिकाणी आला आणि गाडीत जबरदस्तीने टाकले आणि धनंजयसिंग यांच्या घरी घेऊन गेला. तेथे धनंजयसिंग यांनी पिस्तूलने धाक दाखवून धमकी दिली तक्रारीच्या आधारे लाइन बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून रात्री उशिरा शहरातील कालीकुट्टी येथील निवासस्थानी पोहोचल्यानंतर पोलिसांनी माजी खासदारास अटक केली.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget