जितेंद्र आव्हाडांची 'कोरोना'वर मात, डॉक्टर्स, नर्सेसचे मानले आभार

मुंबई - राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘कोरोना’वर मात केली आहे. आव्हाडांनी आपल्या प्रकृतीविषयी ट्विटरवरुन माहिती देत उपचार करणारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांचे आभार व्यक्त केले आहेत.गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेले असून मी आज सुखरुप घरी जात आहे. यापुढेही तुमचे प्रेम आणि आशिर्वाद असेच राहू द्या. परत एकदा त्यांच्या उत्साहात आणि त्यांच्या जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया” असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 
माझ्यावर यशस्वी उपचार करणारे मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन, त्यांना मनापासून धन्यवाद” अशा शब्दात आव्हाडांनी आभार व्यक्त केले आहेत. ‘सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती.’ असे म्हणत त्यांनी कुटुंबियांचेही ऋण मानले. कोरोना’ग्रस्त पोलिसाशी संपर्कात आल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी १२ एप्रिलला ‘सेल्फ क्वारंटाइन’ होण्याचा पर्याय स्वीकारला होता. त्यानंतर काही दिवसांनी ‘कोरोना’ची लागण झाल्याचं आव्हाड यांना समजले होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget