राजावाडी हॉस्पिटलमधील जनरल वॉर्डमध्ये कित्येक तास मृतदेह पडून

मुंबई - मुंबईच्या घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलमधील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मृतदेह जनरल वॉर्डमध्ये कित्तेक तासांपासून पडून असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे.जनरल वॉर्डमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह बेडवर पॉलिथिनमध्ये बांधलेल्या अवस्थेत दिसत आहे. तर शेजारच्या बेडवर कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी राजावाडी हॉस्पिटलमधील हा धक्कादायक व्हिडिओ #shamefulया हॅशटॅगने ट्वीट केला आहे. हे अमानुष कृत्य असून मुंबई महापालिकेने याबाबत दखल घेऊन हॉस्पिटलच्या डीनला निलंबित करायला हवे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सायन रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये मृतदेहांशेजारीच रूग्णांवर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. संबंधित वॉर्डमध्ये चार मृतदेह असल्याचे व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिसत होते. त्यानंतर महापालिकेने या प्रकाराची दखल घेत सायन रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी केली होती. आता घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलमधला असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महापलिका आता काय कारवाई करते, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

- पेशंटचा मृत्यू झाल्यानंतर काही तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे मृतदेह लगेच नेता येत नाही. तो कित्येक तास मृतदेह पडून होता, यात तथ्य नाही. अर्धा ते पाऊस तास ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागतो, असे राजावाडी रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget