वैद्यकीय चाचणीनंतर २४ तासात अहवाल पालिकेकडे पाठवा - पालिका आयुक्त आय. एस. चहल

मुंबई - केंद्र सरकारच्या निदेर्शांनुसार संशयित व लक्षणे असलेल्या व्यक्तींचे नमुने घेतल्यानंतर २४ तासांच्या आत वैद्यकीय तपासणी करून अहवाल संकेतस्थळावर टाकावेत आणि त्याची प्रत महापालिकेकडेही पाठवावी, असे निर्देश पालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी खासगी प्रयोगशाळांना दिले आहेत.खासगी प्रयोगशाळांबद्दल येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी प्रयोगशाळांच्या प्रतिनिधींबरोबर एक विशेष बैठक घेतली. त्यात आयुक्तांनी या प्रयोगशाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसवणारे आदेश दिले. परदेशातून आलेल्या तसेच घरीच विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी विलगीकरणाच्या १४ दिवसांच्या आत करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. यासाठी देखील खासगी प्रयोगशाळांनी आवश्यक ते नियोजन व व्यवस्थापन करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
खासगी प्रयोगशाळांनी संशयितांचे नमुने घेतल्यानंतर तीन ते चार दिवस रुग्णाला अहवालाची प्रतीक्षा करावी लागते. ती व्यक्ती बाधित असेल तर संसगार्चा धोकाही असतो. तसेच अनेकदा खासगी प्रयोगशाळा सवडीने एकत्रितपणे अहवाल संकेतस्थळावर टाकतात व पालिकेला कळवतही नाहीत. त्यामुळे पालिकेच्या आकडेवारीतही तफावत येते.अनेकदा रुग्णांचे संपर्क क्रमांक, पत्ता नीट नोंदवून घेतलेला नसतो. तसेच डॉक्टरांनी तपासणी करण्याची चिठ्ठी अहवालासोबत नसते. अशा अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी खासगी प्रयोगशाळांना फैलावर घेतले.या बैठकीत आयुक्तांनी प्रयोगशाळांनी वैद्यकीय चाचणी अहवाल काटेकोरपणे, बिनचूकपणे व वेळेच्या वेळेत संबंधित संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देश दिले. कोणत्याही परिस्थितीत अहवाल अपलोड करण्यास विलंब होणार नाही, याकडे अत्यंत काटेकोरपणे प्रयोगशाळांनी लक्ष द्यावे, असेही आयुक्तांनी निर्देश दिले. सहाय्यक आयुक्तांनी देखील त्यांच्या कार्यक्षेत्रातील खासगी प्रयोग शाळांच्या कामकाजावर लक्ष ठेवावे, अशाही सूचना महापालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्तांना महापालिका आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिल्या.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget