फेलोशिप मंजूर करा, अन्यथा रस्त्यावर उतरु ; संशोधक विद्यार्थ्यांचा धनंजय मुंडेंना इशारा

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) पात्र ४०८ विद्यार्थ्यांपैकी १०५ विद्यार्थ्यांनाच फेलोशिप मंजूर केली. मात्र, उर्वरित ३०३ संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळावी नाही. विद्यार्थ्यांनी हा प्रश्न लावून धरल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वत: संबंधित विद्यार्थ्यांना ८ दिवसात फेलोशिप मंजुरीचे आश्वसन दिले. मात्र, ३ महिने होत असतानाही अद्याप ते आश्वासन पूर्ण झाले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच हे आश्वासन पुढील ८ दिवसात पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती २०१८’च्या संशोधन विद्यार्थी कृती समितीने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची ६ मार्च रोजी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात पीएचडी व एमफिल करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसंदर्भात मंत्रालयात भेट घेतली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना निवेदन दिले. त्यावर त्यांनी येत्या ८ दिवसातच सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. परंतु ८ दिवसाचे तब्बल ३ महिने झाले तरीही उर्वरित ३०३ संशोधक विद्यार्थ्यांना बाटीर्ची फेलोशिप मंजूर झाली नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन आणि शब्द खोटा ठरला. त्यामुळे येत्या ८ दिवसांत उर्वरित ३०३ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करावी, अन्यथा लॉकडाऊननंतर संशोधक विद्यार्थी बार्टी आणि सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार, असा इशारा या संशोधन विद्यार्थी कृती समितीने दिला आहे.
पुणे येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (सारथी) माध्यमातून २०१८-१९ या वर्षात संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी जुलै ते आॅगस्टदरम्यान अर्ज मागवले होते. या संस्थेने अर्ज आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची कागदपत्रं पडताळणी करुन मुलाखतीच्या माध्यमातून ४ ते ५ दिवसांतच सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली. त्याच धरतीवर बार्टीकडे २०१८ मध्ये आलेल्या अर्जांपैकी कागदपत्राच्या पूर्ततेनुसार पात्र ४०८ विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती तात्काळ मंजूर होणे अपेक्षित होते.
मात्र, बाटीर्ने केवळ १०५ विद्यार्थ्यांनाच फेलोशिप मंजूर केली. उर्वरित ३०३ संशोधक विद्यार्थी अजूनही फेलोशिप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी अनेकवेळा आंदोलनं करुन तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव, बार्टीचे महासंचालक यांचे लक्ष वेधले. २३ मे रोजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा विद्यार्थ्यांच्यावतीने ऑनलाइन निवेदन पाठवले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget