'माझा मृत्यू झाल्यास दानवे जबाबदार' - हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद - राजकारणातून संन्यास घेतलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचे सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझा मृत्यू झाला तर त्याला रावसाहेब दानवे जबाबदार असतील, असे हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत. रावसाहेब दानवेंवर सडकून टीका करतानाचा एक व्हिडिओ हर्षवर्धन जाधव यांनी युट्यूबवर टाकला आहे.२००४ साली मला शिवसेनेची ऑफर होती, मात्र याबाबत तुम्ही मला कळवले नाही, कारण जबाबदारी तुमच्यावर होती. माझ्या निवडणुकीला तुम्ही पैसे दिले म्हणतात, पण मी आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुका माझी संपत्ती विकून लढलो,असे जाधव यांनी म्हंटले आहे. 
तुम्ही फक्त रागातून माझ्यावर खोटा अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. मला पोलिसांनी हे सांगितले आहे. मी तुमच्यासोबत बोलायला दिल्लीला आलो, तर तुम्ही मला धमकावले. माझ्या आईवर गुन्हा दाखल करायची धमकी दिली. माझ्या प्रॉपर्टीवरून तुम्ही खूप खालच्या भाषेत बोललात. तुम्ही राजकारण करताना घरं भरली, पण आम्ही लोकांचे काम केले. तुम्ही कार्यक्रमात टेबल खुर्चीवर जेवता आणि माझ्या आईला मातीत बसवता, तिचा अपमान करता, असे आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला.
माझे वडील आयएएस अधिकारी होते, तुम्ही चौथी पास आहात, तरी जास्त पैसे कमावलेत. पैसे कमवणे माझे संस्कार नाहीत. मला धमकी देऊन तुम्ही २ महिने दिल्लीला ठेवले. तुमच्या मुलीला तुम्ही काही बोलला नाहीत, फक्त मला धमक्या दिल्यात. माझ्यामागे कोणी नसल्याचे तुम्ही म्हणालात, पण तरीही विधानसभा निवडणुकीत मला मते कोणी दिली? तुमच्यात हिंमत असेल, तर मोदींचा चेहरा बाजूला करा, भाजप बाजूला करा आणि लढून दाखवा, पक्षश्रेष्ठींचे पाय चोळल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही, अशी घणाघाती टीका जाधव यांनी केली.तुम्हाला वाटतं हा फार फडफड करतो, कुठेही धरून याला कापून टाकू, पण मी तुमचे छक्के-पंजे असणारे व्हिडिओ काढले आहेत आणि वकिलांना पाठवले आहेत. मला तुम्ही मारलंत किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्ही वाचणार नाही, असा गंभीर आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. 







Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget