अमेरिकेत २४ तासांत १८१३ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू

वाशिंग्टन - अमेरिकेत कोरोना व्हायरचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चोवीस तासात अमेरिकेत १८१३ लोकांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरानेमुळे ८४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात अमेरिकेत सर्वाधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत १४ लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. 
अमेरिकेत कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अस असतानाही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प देश लॉकडाऊनमधून सुरू करण्याचा विचार करत आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी राज्यातील सर्व गर्व्हनरांशी चर्चा केली आणि शाळा सुरू करण्याची तयारी करण्याचे आदेश दिले. 
अमेरिकेचे एक्सपर्ट डॉ. एंथोनी फॉकी यांनी सांगितलं की, अमेरिकेने लॉकडाऊनमधून देश सुरू करण्याची एवढी घाई करू नये. नाहीतर कोरोनाचा कहर आणखी वाढू शकतो. मात्र याकडे ट्रम्प यांनी दुर्लक्ष केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपतींनी दावा केला आहे की, आमचा देश आता महासंकटातून बाहेर येत आहे. जर शाळा सुरू झाल्या नाहीत तर देश सुरू झाला असे वाटणारच नाही
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget