नवी मुंबई पालिकेचा गलथान कारभार ; तरुणीचा समजून दिला तरुणाचा मृतदेह

नवी मुंबई - महापालिका आरोग्य प्रशासनाचा धक्कादायक प्रकार पुढे आला. महापालिका रुग्णालयाच्या शवागरातून तरुणाचा मृतदेह हा तरुणीचा समजून तरुणीच्या नातेवाईकांकडे देण्यात आला. त्यानंतर या मृतदेहावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले गेले. महापालिका रुग्णालयाच्या शवागरातून मोहम्मद उमर फारुख शेख (२९) या व्यक्तीचा मृतदेह चोरीला गेला नसून त्याचा मृतदेह तरुणीचा असल्याचे समजून तो मृत तरुणीच्या नातेवाईकांना दिला गेल्याचे तपासात पुढे आले आहे. विशेष म्हणजे ज्या नातेवाईकांना उमर शेखचा मृतदेह देण्यात आला, त्या नातेवाईकांनी देखील आपल्या ताब्यात घेतलेला मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याची खातरजमा केली नाही. उमर शेख याच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केल्याचे सांगण्यात येत आहे. हा सर्व प्रकार महापालिका रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे उघड झाले आहे.या धक्कादायक प्रकाराची महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी गंभीर दखल घेतली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अन्य कारणांमुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींची देखील सध्या कोविड तपासणी करण्यात येत आहे. कोविड टेस्ट रिपोर्ट येण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत असल्याने हे मृतदेह वाशी रुग्णालयातील शवागरात ठेवले जातात. कोविड टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर हा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना दिले जातात. त्यामुळे वाशी येथील महापालिका रुग्णालयातील शवागरात मृतदेहांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रुग्णालयाकडून एका रॅकमध्ये दोन -दोन मृतदेह ठेवण्यात येत आहेत. उमोहम्मद उमर फारुख शेखचा मृतदेह देखील अशाच पद्धतीने ठेवण्यात आला होता. मात्र कोरोनाच्या धास्तीने शवागरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पॅकबंद असलेला मोहम्मद उमर फारुख शेख याचा मृतदेह महिलेचा असल्याचे समजून त्यांच्या नातेवाईकांना दिला. परंतु आता मोहम्मद उमर फारुख शेख यांच्या नातेवाईकांनी मृतदेह परत देण्याची मागणी केली आहे. आम्हाला आमचा मृतदेह परत द्यावा, अशी मागणी अब्दुल करिम या नातेवाईकाने केली आहे. त्यामुळे आता अधिक गोंधळ उडाला आहे.


Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget