कोरोना व्हायरसबद्दल नवीन माहिती ; लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजच्या शास्त्रज्ञांचा दावा

नवी दिल्ली - कोरोना विषाणूमधील बदलांमुळे त्याचे सामर्थ्य वाढले नाही. याशिवाय वेगाने संक्रमण पसरविण्याच्या आणि मानवी शरीरावर हानी पोहचविण्याच्या क्षमतेवरही कोणताही विशेष परिणाम झाला नाही, असा दावा लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात केला आहे.जगाच्या विविध भागात प्रकोप पसरविणाऱ्या कोरोना विषाणूच्या ३१ स्ट्रेन विषयी अभ्यास करून विविध वैज्ञानिकांनी महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढले आहेत. कोरोनामधील काही बदल सामान्य आहेत. जे बहुधा व्हायरसमध्ये आढळतात. तर काही हानिकारक आहेत परंतु, त्यांचा प्रभाव तितकासा नाही. काही बदल रुग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रतिसादामुळे होते.
लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजच्या संशोधकांनी ७५ देशांमधील १५ हजारांपेक्षा जास्त कोरोना बळीचा अभ्यास केला. व्हायरसमधील बदल किती प्राणघातक आहेत हे जाणून घेण्याची संशोधकांची इच्छा होती, यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढले का? असे संशोधन करण्यात आले.या संशोधनात अशी माहिती पुढे आली की, 'क्रमवारीत काहीही बदल झालेला नाही. त्याच यात काही बदल केले गेले, जे इतर कोणत्याही विषाणूचा प्रसार करण्यास मदत करू शकले. केवळ अशी अपेक्षा केली पाहिजे की, 'हळूहळू बदल सामान्य होतील आणि नंतर मानवी शरीर ते स्वीकारेल'.तसेच, 'कोरोना विषाणूमध्ये आतापर्यंत ७००० पेक्षा जास्त बदल पाहिले गेले आहेत. यापैकी सुमारे ३०० कार्यक्षम प्रभावी आहेत आणि त्यांनी जगातील बर्‍याच देशांमध्ये आपला प्रभाव दर्शविला आहे, असेही या संशोधनातून पुढे आले आहे.
कोरोनाचा व्हायरस बदलण्याचे तीन मार्ग आहेत. प्रथम, तो स्वतःमध्ये काही सुधारणा करीत आहे, दुसरे म्हणजे काही विषाणूच्या संसर्गामुळे आणि तिसरे म्हणजे, संक्रमित व्यक्तीच्या रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये उत्परिवर्तन होते. त्यामुळे हा अभ्यास अतिशय महत्वाचा मानला जातो.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget