मुंबईत १५ दिवसात उभारणार एक हजार खाटांचे कोरोना रुग्णालय

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी चीनने वुहानमध्ये ज्याप्रकारे १० दिवसात एक हजार खाटांचे ‘कोविड-19’ रुग्णालय युद्धपातळीवर उभारले होते. तसेच, रुग्णालय मुंबईतही उभारले जात आहे.महाराष्ट्र सरकार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात एक हजार खाटांचे ‘कोविड-19’ रुग्णालय उभारत आहे. हे रुग्णालय ऑक्सिजन आणि मॉनिटर यंत्रणांनी सुसज्ज असणार आहे. पुढील १५ दिवसांत हे रुग्णालय युद्धपातळीवर उभारले जाणार आहे. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी विशेष टीम तयार करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवातही केली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी युद्धपातळीवर सुरु असलेल्या या रुग्णालयाच्या कामाची पहाणी केली. 
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील भूखंडावर उभारल्या जात असलेल्या या‘कोविड-19’ रुग्णालयाच्या कामाची पाहाणी केली. अंदाजे पुढील १५ दिवसांत हे रुग्णालय उभे राहणार आहे. त्यापैकी काही भाग हा येत्या ८ दिवसांत सुरु करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget